शासनाच्या महत्वकांक्षी योजने पैकी एक म्हणजे जलयुक्त शिवार योजना या योजनें मध्ये सहभाग घेऊन गावातील सर्व पाझर तलाव तसेच सिमेंट बंधारे यांची दुरुस्ती करण्याच काम जलयुक्त च्या माध्यमातून ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येत आहेत त्यामुळे गावातील पाडणाऱ्या पावसाचे पाणी गावातच अडवून त्याचा फायदा परिसरातील लोकांना कसा होता येईल याकडे ग्रा प ने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहेत गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी पाणलोट चे काम मोठ्या प्रमाणात केलेले आहेत त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत , तसेच पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून वाहून नेऊन शेतात गाळ मुक्त धरण व गाळ युक्त जमीन ची संकल्पना राबवण्यात आली आहेत .




