ग्रामपंचायतने डिजिटल सेवांचा मार्ग स्वीकारून पेपरलेस सेवा सुरु केल्या आहेत. या अंतर्गत ग्रामपंचायतचे सर्व कार्यालयीन कामकाज ऑनलाईन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांना लागणारे सर्व प्रकारचे दाखले आता ऑनलाईन दिले जातात. जन्म व मृत्यूची नोंद पासून चालू असलेल्या प्रमाणपत्रांचे देखील ऑनलाईन वितरण केले जाते. तसेच, पॅन कार्ड, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक दाखले ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळवता येतात.
शासनाच्या विविध योजनांसाठी लागणारे अर्ज आणि फॉर्म्स देखील ग्रामपंचायतमध्ये भरले जाऊ शकतात. यामुळे ग्रामस्थांना सरकारी कामकाजात सहजता मिळते आणि वेळ वाचतो.
या डिजिटल सेवांमुळे ग्रामस्थांना प्रत्येक सेवा मिळवणे सोपे झाले आहे, तसेच पारंपारिक कागदपत्रांची गरज कमी झाली आहे. पेपरलेस ग्रामपंचायतमुळे गावातील प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध झाले आहे.




